‘याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय लक्षात ठेवा’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
मुंबई | एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली व उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीचं खापर शिंदे गटात गेेलेल्या बंडखोर आमदारांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर फोडलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांची भूमिका मांडली.
संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारांची पालापाचोळ्याशी तुलना केली. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचंय म्हणू द्या. पण लक्षात ठेवा, याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवला आहे, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे जनतेनं पाहिलं आहे, असा टोला देखील एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
दरम्यान, त्यांना आणखी काही बोलायचं तर बोलू द्या. सगळ्याला एकत्रितपणे उत्तर देऊ, अशा मोजक्या शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही तर बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती, असंही शिंदे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले, त्यांना नारायण राणेंनी परत आणलं”
‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी
“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”
‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी
निवडणुकांचा धुरळा उडणार; 236 प्रभागांसाठी ‘या’ दिवशी आरक्षण सोडत होणार जाहीर
Comments are closed.