पूरजन्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला नागरिकांना धीर; म्हणाले..

Eknath Shinde Review Pune And Mumbai Rain Order To Administration Marathi News

Eknath Shinde | राज्यभरात मुसळधार पावसाने धमाल मचावली आहे. जिकडे तिकडे पावसाचा हाहाकार आहे. पुणे, मुंबई, सांगली, ठाणे, पालघर, हिंगोली, नाशिक, रत्नागिरी येथे मुसळधार पावसाची परिस्थिती दिसून आली. मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुणे शहरात देखीस ठिकठिकाणी मुसधार पावसाने नागरिकांच्या घरात पाणी गेलं आहे. तर इमारतींच्या पार्किंगमध्ये देखील पाणी साचलं आहे.

एकनाथ शिंदेंनी नागरिकांना धीर दिला

मुंबईत विविध भागात पाणी साचलं आणि पुणे शहरात देखील अशीच परिस्थिती आहे. तर पुणे शहरातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने होत्याचं नव्हतं झालं आहे. याचपार्श्वभूमीवर आता प्रशासन सक्रिय झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना धीर दिला आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुणे जिल्हा प्रशासनासोबत बोलणं केलं आहे.

ज्याठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे त्याठिकाणी बचाव कार्य वेगानं काम करत आहे. काळजी करण्याचं काहीही एक कारण नाही, नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडा, असं एकनाथ शिंदेंनी आवाहन दिलं आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांनी एकमेकांत आपला समन्वय साधण्याचं काम करून मदत करावी, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, एक टीमवर्क म्हणून पूरजन्य परिस्थितीपासून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. नौदल, लष्कर यांची मदत घेतली आहे. मुंबईच्या उपनगरामध्ये देखील पाऊस सुरू आहे. मुंबईत कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन काम करत आहे.

पुण्यात संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ज्याठिकाणी लोकं अडकले आहेत. त्यांना हेलीकॉप्टरने कसं वाचवता येईल ते पाहण्यास सांगितलं. मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे पावसाचे पाणी साठलं आहे. मुंबईत 255 पंप सुरू आहेत.  (Eknath Shinde)

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली – एकनाथ शिंदे

मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाऊस आणि पूर परिस्थितीत असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. माझं आपणास आवाहन आहे की, आपण घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे, फिल्डवर जात काम करत असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

News Title – Eknath Shinde Review Pune And Mumbai Rain

  महत्त्वाच्या बातम्या

“कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार, विधानसभा स्वबळावर लढणार”; राज ठाकरेंची मोठी घोषणा

पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…

पुण्याला पावसाने धो-धो धुतलं! जनजीवन विस्कळीत, 24 तासातली आकडेवारी धक्कादायक

पुण्यात पावसाचा धिंगाणा, तीन जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .