Eknath Shinde | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे अवघ्या जनेतंचं तसsच राजकारणातील नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर काळजीवहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले आहेत. शिवाय अडीच वर्ष जनेतेसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.
यावेळी बोलत असताना शिंदे म्हणाले की, मी एक काॅमन मेन म्हणून काम केलं आहे. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मी मोदींना फोन केला- एकनाथ शिंदे
यावेळी बोलत असताना शिंदे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. तसेच ते म्हणाले की “आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही. मी काल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना माझ्यामुळे किंवा कुणामुळे अडचण होईल, असं कधीही मनात आणू नका.”
तुम्ही आम्हाला अडीच वर्षे संधी दिली. तुम्ही महायुतीचे आणि एनडीएचे प्रमुख म्हणून निर्णय घ्या. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी जसा अंतिम असतो तसा आम्हालाही आहे. त्यामुळे माझी कोणतीही अडचण नाही. मी माझ्या भावना त्यांना सांगितल्या, असं शिंदेंनी सांगितलं.
जो निर्णय घ्यायचा तो-
तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. तो निर्णय मला मान्य आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी मांडली. दरम्यान, यावेळेस बोलत असताना ते म्हणाले की, मी कधीही लोकप्रियता मिळावी यासाठी काम केलं नाही.
मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो. आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली.
News Title : eknath shinde says I didnt worked to gain popularity
महत्त्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे शिंदेंना मान्य, जाता जाता म्हणाले…
महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला मिळणार डच्चू?
श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ