बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला गेल्या महिन्याभरात कोणी नसतील दिले एवढे धक्के दिले आहेत. सर्वप्रथम त्यांनी बंड करत पक्ष फोडला, नंतर त्यांनी आपल्या गटातील आमदारांना घेऊन महाराष्ट्राबाहेर पोबारा केला. त्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळू लागले. त्यामुळे शिवसेना पक्षाला आता उतरती कळा लागली आहे.

सुरुवातीपासूनच म्हणजे बंडाच्या दुसऱ्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असा पवित्रा घेतला होता. तसेच त्यांनी शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि आता संसदेच्या इमारतीतील शिवसेनेच्या कार्यालयावर दावा सांगितला. आता त्यांनी आपल्या पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता मिळावी याकरीता निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे.

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता, शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळावे म्हणून आता शिंदे गटाकडून मुख्य निवडणूक आयोगाला (Election Commission) रितसर पत्र देण्यात आले आहे. तसेच या पत्रात शिंदे गटाने म्हटले आहे की, शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी एकत्र येऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केली आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) आहोत, अशी आम्हाला मान्यता मिळावी.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अगोदरच या येणाऱ्या संकंटाची नोंद घेऊन, त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. त्यात त्यांनी शिवसेना पक्षासंदर्भात कोणतीही याचिका दाखल झाल्यास त्यावर सुनावणी घेण्यास सांगितले आहे. सुनावणीपूर्वी कोणताही आदेश किंवा निर्णय न घेण्याची विनंती ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुळशी धरण परिसरात जमिनीला भेगा, नागरिक भयभीत

‘घोटाळे करायचे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…’,आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका

‘फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे ते…’, संजय राऊतांचा हल्लाबोल

तिसऱ्यांदा आई बनणार करिना कपूर?, पोस्ट करत म्हणाली…

“दिल्लीच्या दरबारात शिंदे बाद’शहां’च्या भेटीविना 12 तास तात्कळत बसले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More