Eknath Shinde l एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रत्नागिरी येथे झालेल्या सभेत जोरदार भाषण करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. “दाढी होती म्हणून तुमची उद्धवस्त झाली महाराष्ट्रविरोधी आघाडी, आणि सुरू झाली विकासाची आघाडी,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शिंदे यांनी आपल्या भाषणात सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, आम्ही लोकांसाठी राजकारणात आलो आहोत,आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही, तर लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करतो, असं म्हटलं.
सर्व योजना सुरूच राहणार – शिंदे यांची मोठी घोषणा
शिंदे यांनी आपल्या सरकारच्या धोरणांवर बोलताना स्पष्ट केले की, “विकासाची कोणतीही योजना बंद होणार नाही. आम्ही खोटी आश्वासने देत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो.” त्यांनी “लाडकी बहिण” योजना आणि इतर सरकारी उपक्रम सुरूच राहतील, असेही स्पष्ट केले.
Eknath Shinde l “रश्शी जळाली पण पिळ जात नाही” – उद्धव ठाकरेंवर निशाणा
राजकारणात बदल होत राहतात, पण “मला लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ती सर्व पदांपेक्षा मोठी आहे,” असे म्हणत शिंदे यांनी आपल्या लोकप्रियतेवर भर दिला. ते पुढे म्हणाले, “माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी महाराष्ट्रासाठी समर्पित राहीन. काही लोक ‘खोके-खोके’ ओरडत असतात, पण महाराष्ट्राने त्यांना घरी बसवलं. तरीही त्यांना कळत नाही. ‘रश्शी जळाली पण पिळ जात नाही’ अशी यांची अवस्था झाली आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “मी कुणाच्या नादी लागत नाही, मी आरोपांना उत्तर देत नाही, माझं उत्तर माझ्या कामातून देतो.” त्यांनी आपला महादजी शिंदे पुरस्कार झाल्याचा उल्लेख करत “एक मराठी माणसाच्या हस्ते, मराठी माणसाचा सन्मान झाला, याचा महाराष्ट्राला अभिमान आहे,” असेही सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितले, “तुम्ही साहित्यिकांना दलाल म्हणता, ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं, त्यांचाही अपमान करता. काही जनाची नाही, तर मनाची तरी ठेवा!”