बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

पुणे | केंद्राने भेदभाव न करता राज्याला भरीव मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपंजी आहे. भेदभाव न करता केंद्र सरकारने मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे, असं शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. पॅकेज जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. कोकणात पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भिती आहे. त्यामुळे आम्ही कॅम्प राबवतोय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ठाण्यातील धर्मवीर दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाली असून शिबीरांना सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

आसाम-मिझोराम वाद चिघळला; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे ताजे दर

शेतकऱ्याला राग अनावर; भररस्त्यात भाजप नेत्याचे कपडे फाडले, पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोनाच्या बदलत्या रूपानं लक्षणातही होतोय बदल

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; फायनलमध्ये धडक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More