“अंधारात आमदारांना सुरतला पाठवलं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”
मुंबई | कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे.
पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?, असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही, असं रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिक प्रभावी आणि आक्रमकपणे मांडला जात असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये.
या प्रकरणावर शरद पवारांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘मी कर्नाटकात जाऊन…’; अभिजीत बिचुकले भडकले
- ‘संजय राऊत तोंड आवरा नाहीतर पुन्हा…’; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा गंभीर इशारा
- एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- भाजप मंत्र्याच्या अडचणीत वाढ; लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा चर्चेत
- शिंदे-फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा!
Comments are closed.