बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप प्रवेशासाठी राणेंनी दिलेल्या खुल्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेमध्ये बोलताना शिवसेनेचे नेत्याला भाजप प्रवेशासाठी खुली ऑफर दिली होती. नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ऑफर देत शिवसेनेवर निशाणा साधला होता. अशातच यावर एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मी माझ्या पक्षात पूर्ण समाधानी आहे. मला माझ्या खात्यांतर्गत विषयावर निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असून मला दिलेलं काम मी नियोजनबद्ध रितीने पार पाडत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे स्वतःही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री असल्याने उद्या धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी त्यांनाही मोदींना विचारूनच तो निर्णय घ्यावा लागेल. त्यात गैर असं काहीच नाही त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही, एवढंच मला स्पष्ट करायचं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.  त्यासोबतच नारायण राणे हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच तो घ्यावा लागतो हे त्यांना देखील नक्कीच ठाऊक असेल, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे फक्त शिवसेनेत नावापुरते मंत्री राहिलेले नेते आहेत. त्यांंना एकाही फाईलवर मातोश्रीला विचारल्याशिवाय सही करता येत नाही. ते शिवसेनेत कंटाळलेले आहेत. मी त्यांना फोन करणार आहे. ते जर आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागत असं राणे म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

“श्रीरामाचा भक्त येतोय, श्रीरामांनी त्यांना चरणापाशी जागा द्यावी”

“रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधानपदाचा अपमान”

“नवनीत राणा वायफळ बोलतात, त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती समोर!

“वेळीच चर्चा करा, अन्यथा काश्मीरचा अफगाणिस्तान होईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More