बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरावती हत्याकांडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | अमरावतीत नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर भाष्य केल्याने एका औषध व्यावसायिकाची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. यानंतर अमरावतीचे वातावरण तापले होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली असून त्याचा पुढील तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी एका वाहिनीवर बोलताना प्रषित मुहम्मद पैगंबर यांच्यावर भावना दुखावणारे भाष्य केले होते.

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी विचारले असता त्यांनी ही घटना नक्कीच चिंताजनक आहे. ज्यांनी हत्या केली आहे त्या सर्वांना अटक करण्यात आली असून एनआयएने तपास हाती घेतला आहे. ही घटना राष्ट्रीय स्तरावरील असून सरकारचे त्यावर लक्ष आहे, असे मत दिले. सुरुवातीला पोलीस ही हत्या नुपूर शर्मांच्या संबंधित नाही असे सांगत होते. परंतु आता त्यांनी ह्या हत्येचा संबंध नुपूर शर्मांच्या प्रकरणाकडे असल्याचे सांगितले.

राजस्थान येथील उदयपूर येथे देखील काही दिवसांपूर्वी एका शिंप्याची नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे दोन तरुणांकडून हत्या करण्यात आली होती. मोहम्मद रियाज आणि घौसे मोहम्मद अश्या दोघांना याप्रकरणी अटक केली आहे. आता तशाच प्रकारची हत्या अमरावतीमध्ये घडली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुस्तीर अहमद (22), शाहरुख पठाण (25), अब्दुल तौफीक (24), शोएब खान (22), अतिब रशिद (22) आणि युसुफ खान बहादुर (44) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात

मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच

शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

‘केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही’; सभागृहात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More