महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं.
कालपासुन शिवसेनेचेे मंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत सुरतमधील एका हॅाटेलमध्ये आहेत. हॅाटेलबाहेर कडक बंदोबस्त करण्यात आला होता. काल शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी भेटायला गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांशी फोनवरुन बोलणंही झालं होतं,पण सध्याची परिस्थिती पाहता याचा काही उपयोग झाला नसल्याचं दिसून येतयं.
सध्या सगऴ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुहावटीला गेले आहेत. गुहावटीच्या एका हॅाटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सकाळी 9.30 वाजता एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा होणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि 40 आमदार मिळून स्वतंत्र गट तयार करणार आहेत. यावर एका पत्रावर काल या सगळ्यांनी सही करत संमती दर्शवली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर हा गट भाजप सोबत जाईल? की महाविकास आघाडी विरूद्ध अविश्वास ठराव दाखल करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थो़डक्यात बातम्या
एकनाथ शिंदेंसोबत ‘या’ फोटोत कोण कोण आहे?, वाचा संपूर्ण नावं एकाच ठिकाणी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना गुवाहाटीला नेणार
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिजीत बिचुकलेंसह 20 जणांच्या संपर्कात”
‘परत जाऊ नका आता’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला
“आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”
Comments are closed.