एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?, फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं

Eknath Shinde | अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची (BJP) कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही यावर मोठं वक्तव्य केलं. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार?

महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टींचा सस्पेन्स दूर केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रिमंडाळात राहणार का? यावर प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हा सस्पेन्स दूर केला आहे.

तिघांचा शपथविधी?

पत्रकार परिषदेत बोलत असताना, फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

तिघांची शपथ होईल. आणखी कोणाचा होणार हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहे. पद ही तांत्रिक गोष्ट आहे. पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर नेणावर आहोत. जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यावर आमचा भर असेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

News Title : eknath shinde to take the oath of dcm

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही’; अजित पवारांच्या वक्तव्याने सगळे खळखळून हसले

मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

पुन्हा मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

शपथविधीआधी फडणवीसांचा शिंदेंना धक्का?, ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

“2019 ला बेईमानी झाली, खूप त्रास… “; तिसऱ्यांदा CM होणाऱ्या फडणवीसांच्या मनातील खदखद समोर