बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ

मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचा हात धरून त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचा मंत्रालयातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान सांगितलं. मात्र, तुम्ही आधी बसा असा आग्रह एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना केला. त्यानंतर फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या हाताला धरून बसा म्हणत खुर्चीवर बसवलं. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधीनंतर आज पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले. एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात आज कारभार स्विकारला असून शिंदे सरकारच्या राज्य कारभाराला आता अधिकृतपणे सुरूवात झाली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

नासक्या भाजीची उपमा देत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले, म्हणाले…

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका; घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More