बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिल्लीच्या दरबारात शिंदे बाद’शहां’च्या भेटीविना 12 तास तात्कळत बसले”

मुंबई | महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यातील विविध प्रश्न आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा महत्वाचा प्रश्न घेऊन दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटावयास गेले आहेत. शिंदे नवी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात (New Maharashtra Sadan) थांबले आहेत. ते बारा तास मुख्यमंत्र्याच्या कक्षेत बसून होते. परंतु त्यांना भेटायला 12 तासांत एकही भाजपचा नेता आला नाही, असे वृत्त आहे.

एकनाथ शिंदे हे बारा तास आपल्या सदनिकेत बसून होते. त्यांच्या ह्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेने सामना मुखपत्रातून टीकेचे धनुष्यबाण सोडले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाची सूत्रे दिल्ली ठरवत नाही, शिवसेनेने महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री दिले पण त्यांचे निर्णय दिल्लीत झाले नाहीत. महाराष्ट्र आताच्या घडीला दिल्लीसमोर झुकत आहे, असे सामनातून म्हटले गेले आहे.

आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांत देखील फूट पडली आहे. शिवसेनेचे लोकसभेत एकूण 18 खासदार आहेत. त्यापैकी 12 खासदारांनी शिंदे गटात जाण्यासाठी बॅगा भरल्या आहेत. या सर्व 12 खासदारांच्या गटाने शिंदे यांना पाठींबा देण्याची आणि लोकसभेत वेगळा गट करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासंदर्भात 12 खासदारांच्या सह्यांचे पत्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना देण्यात आले आहे.

लोकसभाध्यक्षांना दिलेल्या पत्रात शिवसेना खासदारांनी तीन मागण्या केल्या आहेत. शिवसेनेच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यावी, शिंदे गटाच्या खासदारांची आसनव्यवस्था वेगळी करावी, शिंदे गटाचे नेते म्हणून राहुल शेवाळे यांना मान्यता द्यावी. तर बिर्ला यांनी अर्ज स्वीकारत पुढील कार्यवाहीसाठी सूचना केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘पूर्वीचे सुलतान मंदिरं पाडायचे,आताचे सुलतान शिवसेना पाडतात’; खासदार फोडल्यानंतर सेना आक्रमक

मोठी बातमी! संजय राऊतांना पुन्हा एकदा ईडीचा झटका

नवाब मलिकांना ईडीचा दणका, तुरूंगातील मुक्काम वाढणार?

फोन टॅपिंग प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई!

“उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच मी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More