संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य; एकनाथ शिंदे अडचणीत येणार?
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतानाच आता ठाकरे गटाने दिल्लीतही शिंदे यांच्याविरोधात हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाकरे गटानेकेंद्र सरकार आणि तपास यंत्रणांकडेच शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे देण्यात आली आहेत.याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिल्याने एकच खळबळ उडालीये.
मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रं पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रं गेली आहेत. अनेक तपास यंत्रणांकडे कागदपत्रं गेली आहेत. आम्ही योग्य ठिकाणी कागदपत्रे दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाईने दिल्लीत आले, असं संजय राऊतांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत?, असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.