आता पुढं नेमकं काय होणार?, गुवाहाटीतून शिंदे गटातील आमदाराचा मोठा खुलासा
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. शिवसेना आमदार फुटल्यानंतर आता आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जात आहे. एवढंच नव्हे तर शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या गटाला मिळावे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. वेळ पडली तर त्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी देखील त्यांनी केल्याची माहिती आहे.
राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या आमदारांची संख्या वेळ जाईल तशी वाढत आहे आणि त्यांच्या गटाकडून काही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सगळं आमच्या मनासारखं घडत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जसे ठरवले तसेच घडत आहे, अशी प्रतिक्रिया एका आमदारांने खासगीत बोलताना दिली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या खेळीला यश आले का? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भविष्यात शिंदे गटच शिवसेना म्हणून उदयाला येणार का?, आणि खरोखरच शिवसेना पक्षाची कमान एकनाथ शिंदेंच्या हातात जाणार का? शिंदे गट भाजपशी युती करुन सत्ता स्थापन करणार का? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहेत. येणाऱ्या काळातच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.
थोडक्यात बातम्या –
‘मला उमेदवारी दिली असती तर..’; छत्रपती संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
खळबळजनक: उद्धव ठाकरेंना भेटण्यास शिवसेना आमदारांना सहन करावा लागायचा असा प्रकार!
प्रति, उद्धव ठाकरे, पत्रास कारण की… संजय शिरसाट यांचं स्फोटक पत्र
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”
“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ
Comments are closed.