…तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे राहणार नाही- उल्हास बापट
मुंबई | मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. यासाठी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत. त्याआधी कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.
कायद्यानुसार हे लोक अपात्र झाले तर कुठलाही मंत्री राहणार नाही किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही, असं कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी म्हटलं आहे.
नियमानुसार सगळेच आमदार एकत्र बाहेर पडले पाहिजे पण हे एक एक करत गेले आहेत, त्यामुळे हे कायद्यात बसणार नाही असं उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी म्हटलं आहे.
बाहेर पडणारे लोक आम्हीच शिवसेना असं म्हणत आहेत हा अत्यंत हास्यास्पद विषय आहे. खरी शिवसेना कोणती हे पार्टीमध्ये ठरवावे लागतं ते विधानसभेत ठरवता येत नाही, असं उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी म्हटलं नाही.
जो काही निर्णय पाच जणांनी दिला तर तो महाराष्ट्रासाठी बंधनकारक राहील, मात्र हाच निर्णय सात जणांनी दिला तर तो देशासाठी बंधनकारक राहील, असंही बापट यांनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.