मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, आता…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतली, तो मान्य असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. यामुळे महायुतीच्या सत्तास्थापनेच्या वाटपात राज्यातील मुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्याल जाणार आहे. त्यामुळे, शिवसेना व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद व इतर महत्त्वाची खाती देण्यात येतील, असं समीकरण सध्या पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे सध्या स्पष्ट झालं आहे. आता मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर ते आता राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. शिंदेंचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिलीये.

एकनाथ शिंदे कदाचित मुख्यमंत्रिपदही स्वीकारणार नाहीत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाही. शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यास सांगेल. एकनाथ शिंदे यांना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असंही शिरसाट म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईकरांनो काळजी घ्या!, हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर

निवडणूक आयोगानं बातमी तर शेअर केली, मात्र कमेंट सेक्शन बंद करुन ठेवला!

…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्यासाठी मोठा….”

मणिपूरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर; वाचून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल