मुंबई | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. बेळगाव सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहिदाचा दर्जा देण्याची मागणी शिंदे यांनी या पत्रात केली आहे.
8 फेब्रुवारी 1969 रोजी केंद्रीय मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत असताना काही शिवसैनिक चिरडले गेले होते. त्यांनतर आठ दिवस मुंबईतील वातावरण तापलं होतं. यावेळी झालेल्या दंगलीत 67 शिवसैनिकांचा जीव गेला होता.
बलिदान दिलेल्या या 67 शिवसैनिकांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. बेळगाव सीमा लढ्यात शिवसैनिकांनी दिेलेल्या बलिदानाची आठवण म्हणून त्यांना शहीद म्हणून घोषीत करावं, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये सीमा भाग समन्वय मंत्री म्हणून काम पाहतात. दरम्यान, मुख्यमंत्री शिवसैनिकांना शहिदाचा दर्जा देतात का? हे पाहावं लागेल.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक; मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ती घोषणा फसवी!
संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी
महत्वाच्या बातम्या-
महामोर्चाआधी मनसेला गुड न्युज; या दोन नेत्यांनी केला ‘मनसे’ प्रवेश!
“मी महाराष्ट्राची मुलगी; घाबरणार नाही, गप्प बसणार नाही”
ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचा फायदा गावातील 5 लोकांनाही मिळत नाही- राजू शेट्टी
Comments are closed.