एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका!
मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भाऊ चौधरी आणि त्यांचे निकटवर्तीय सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
संजय राऊतांसाठी हा मो ठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात असतांना त्यांना जामीन मिळवण्यासाठी संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत आणि भाऊसाहेब चौधरी यांनी सह्या केल्या आहेत. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे जामीनदार असल्याचं कळतंय.
संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
संजय राऊत यांना जामीनदार असलेल्या चौधरी यांच्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट राऊत यांना करण्याची वेळ आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
- वाढत्या कोरोनामुळे केंद्र सरकाने घेतला मोठा निर्णय!
- जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांना मोठा झटका!
- ‘तुमच्या तोंडात काय बोळा कोंबलाय का?’; संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
- “कर्तुत्व शून्य असताना गद्दारी करुन मिळवलेली खुर्ची गेल्याने तडफड सुरूये…”
Comments are closed.