बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदेंचा अनिल परबांना सर्वात मोठा झटका!

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याने बहुचर्चित असलेल्या व सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या साई रिसॉर्टवर आता कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता नंबर अनिल परब यांचा. त्यांचे साई रिसॉर्ट पडणार, असं सोमय्या यांनी सोमवारी ट्वीट केलं होतं.

साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे, तसंच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केला गेल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 मध्ये दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होतं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More