एकनाथ शिंदेंचा बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. शिंदे सरकार स्थापन होऊन आता अनेक महिने उलटलेत मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. सत्तास्थापनच काय पण पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊनपण महिने उलटलेत. मात्र, उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडतोय. मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार नसल्याची चिन्ह दिसत असताना अखेर दिल्लीत खलबतं झाली आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त लागलाच. पण यासोबतच शिवसेनेत बंड करून शिंदेसोबत आलेल्या काही आमदारांना पण एकनाथ शिंदे मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगतीये.

शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातले 9 मंत्री शिंदे गटातले तर 9 मंत्री हे भाजपातले आहेत. मात्र, आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळजवळ सहा महिने लोटले पण तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार कधी होणार याकडे सगळ्याचंच लक्ष लागलेलं असताना अखेर दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरलाय.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार हा येत्या नवीन वर्षात होणार असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय. हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे,फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा होती. पण हिवाळी अधिवेशनापूर्वी याची शक्यता दिसत नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनासाठी त्यांच्याकडचा अतिरिक्त खात्यांचा पदभार पण इतर मंत्र्यांकडे सोपवला. खरी शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय आयोग 20 जानेवारीपर्यंत निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय येताच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलीये.

जानेवारी 2023च्या शेवटच्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. पण यावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदेंच भविष्यासाठी नवी टीम तयार करण्याचं लक्ष्य आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आता त्यांच्याच गटातील काही आमदारांना मोठा धक्का देऊ शकतात. शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवंय. जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर हे आमदार फुटतील, या भीतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्याप्रमाणे शिंदे गटात मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आमदारही आहेत. पण पुन्हा पुन्हा ठाकरे गटात जाण्याची धमकी देणाऱ्या आमदारांना आणि वाचाळवीरांना मात्र मंत्रिपदापासून लांबच ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून कोण शपथ घेणार याबाबतही जोरदार चर्चा सुरू झाल्यात. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नावाची तर सुरूवातीपासून चर्चा आहेच. पण भाजपकडून प्रसाद लाड, शिवेंद्रराजे भोसले, संभाजी पाटील निलंगेकर, अमरिष पटेल, जयकुमार रावल, गणेश नाईक, राहुल कुल, कृपाशंकर सिंग, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या नावाची चर्चा सुरूये. तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बालाजी किणीकर, किशोर पाटील, सदा सरवणकर यांची नावं आघाडीवर आहेत. आता या मंत्रिमंडळ विस्तारात कोणला संधी मिळणार कोणाला वगळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणारे.

महत्त्वाच्या बातम्या-