‘सरकारचा फायदा घटक पक्षांना, शिवसैनिक मात्र फक्त भरडला गेला’; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट
मुंबई | एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच समोर येत प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यायला तयार आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.
उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतली. तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवा, या प्रस्तावावर काँग्रेस व राष्ट्रवादीचं एकमत झालं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.
गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसेना आणि शिवसैनिकाचं पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे, असा इशारा देखील एकनाथ खडसेंनी दिला. तर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीतून बाहेर पडावं या मागणीवर एकनाथ खडसे ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
थोडक्यात बातम्या-
“वाद सैन्य दलाच्या भरतीचा होता, मात्र चलाखीने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात आला”
“समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”
…आणि निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे चक्क गोष्ट सांगायला लागले!
“आज संध्याकाळी मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतोय”
उद्धव ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करणार, ट्विट करत म्हणाले…
Comments are closed.