बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत

गांधीनगर | शिवसेनेचे बंडखोर नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काही केल्या हार मानण्यास तयार नाहीत. पक्षप्रमुखांचे, वरिष्ठ नेत्यांचे ते ऐकत नाहीत. दिवसेंदिवस त्यांच्या गटाला शिवसेनेचे नवनविन मंत्री आणि आमदार जाऊन मिळत आहेत. इकडे महाविकास आघाडी सरकारने बंडखोर आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यातील राजकीय पेच वाढत आहे.

गेले काही दिवस शिंदे महाराष्ट्राबाहेरुन ट्विटरच्या माध्यमातून आपली मते आणि मागण्या सांगत आहेत. आता नवीन ट्विट करत एकनाथ शिंदे पुन्हा चर्चेत आले आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसं झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, असं ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली.

आणखी एक ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधता आहे. मुंबई बाॅंबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करु शकते? यालाच विरोध म्हणून उचलेलं हे पाऊल, असं ते म्हणालेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून ते आता या गटाविरुद्ध कायदेशीर लढाई करणार आहेत. एकनाथ शिंदे यांना काढून शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. आता शिंदे गटानेही अपात्रतेच्या कारणावरुन न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. 27 जून रोजी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; केंद्राने घेतला हा निर्णय

सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड यांना अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी अमित शहा मैदानात?, महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More