एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले…
मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटात गेलेल्या आमदारांना जबरदस्ती गुवाहाटीतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊतांसह उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंनीही केला. एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
बाहेरून काही लोक गुवाहाटीतील आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी कोणते आमदार संपर्कात आहेत ते सांगावं मग सगळच स्पष्ट होईल, असं जाहीर आव्हान एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.
दरम्यान, आमच्यासोबत 50 आमदार असून ते आनंदी आहेत व त्यांच्या मर्जीने आले आहेत, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. तर समोरचे लोक खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘जे नाव एकनाथने दिलं त्याला विरोध नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
भाजपच्या गोटात हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
“राज ठाकरेंनी कारकूनाला ‘सामना’चं संपादक बनवलंय, हे त्यांनी विसरू नये”
“मनसे पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन, सल्ले घेताना हिशोब बघून घ्या”
राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये!, पत्र लिहून मागवली ‘ही’ मोठी माहिती
Comments are closed.