एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?; कार्यकर्त्यांनी दानवेंना धारेवर धरलं

जळगाव | एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?, असं म्हणत खडसे समर्थकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना घेरलं. शनिवारी भुसावळ येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा तास दानवेंना घेराव घातला.

यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा खडसेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. 

माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का निर्दोष आहे? हे राज्याला कळू द्या, असं आवाहनही खडसेंनी यावेळी पक्षाला केलं.

दरम्यान, यासंदर्भात निर्णय न घेतल्यास पक्षाचे नुकसान होऊ शकते, असा इशारा कार्यकर्त्यांनी दानवेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर ‘अवनी’च्या मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू!

-सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता; तसं अवनीच्या मृत्यूचं पापही घ्या!

-आरोपांमुळे मुनगंटीवार संतापले; निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

-मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे; संजय निरुपमांचा आरोप

-संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या