नाशिक महाराष्ट्र

काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना उचलायचाय विखेंना हरवण्याचा विडा!

अहमदनगर | विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त उमेदवार इच्छुक असल्याचं दिसून आलं.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना जर तिकीट मिळालं तर ते गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखेंना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी इच्छुक उमेदवारी अर्ज भरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘सीसीडी’चे मालक बेपत्ता; सापडलं भावनिक पत्र

-पुलवामा हल्ल्याच्यावेळी मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त???

-गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाआधीच आमदार मंदा म्हात्रे आक्रमक!

पदभार स्विकारल्याक्षणी राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षा सरकारविरोधात आक्रमक!

संसदेत दुष्काळावर भाषण अन् विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या