पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच बंद होणार प्रचार; निवडणूक आयोगाचा निर्णय

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता निवडणूक आयोगाने तेथील प्रचार कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

19 मे रोजी शेवटच्या टप्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेत एक दिवस आधी प्रचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील प्रचाराचा कालावधी 20 तासांनी कमी केला आहे. त्यामुळे गुरूवारी रात्री प्रचार थांबणार आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वात जास्त हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्या आहेत, असा दावा भाजपने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-वाराणसीमध्ये ‘रोड शो’ दरम्यान प्रियांका गांधींच्या डोक्याला दुखापत

-काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला योगींच्या समर्थकाची घोषणाबाजी

-“मोदी मनमोहन सिंह यांची खिल्ली उडवायचे; देश आज मोदींची खिल्ली उडवत आहे”

-मोहरमची वेळ बदला, दुर्गा पुजेची नाही- योगी आदित्यनाथ

-ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला; मोदींचे ममतांवर टीकास्त्र