भाजपला निवडणूक आयोगाचा दणका; दोन सभांचे साहित्य केलं जप्त

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. कोणतीही परवानगी न घेता सभा आयोजित करणे छत्तीसगड भाजपला महागात पडले आहे.

भाजपने आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप लगावत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. तसंच सभेच्या स्थळावरील बांबू, खूर्च्या आणि भांडीसह रेशनही जप्त केले आहे.

सुकमा जिल्ह्यातील कोटा ब्लॉक येथे भाजपने विनापरवानी सभा आयोजित केली होती. याची माहिती मिळताच प्रभाग अधिकाऱ्यांनी पथकासह सभास्थळी धाव घेतली आणि सभेचे साहित्य जप्त केले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचार संहिता लागू केली. आचार संहितेतील नियमांनुसार कोणताही राजकीय पक्ष प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रचार सभेचे आयोजन करू शकत नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय- देवेंद्र फडणवीस

-मी राजकारणात आले तर तिसरं महायुद्ध घडेल!

-येवलेकरांचे उपकार मी कधीच विसरणार नाही- छगन भुजबळ

-जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, मी नानांसोबत आहे!

-…म्हणून भाजपच्या माजी आमदारानं छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी!