केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश
नवी दिल्ली | कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे.
ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत त्या राज्यातील कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. अशा स्वरुपाचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य खात्याला लिहिलं आहे. केंद्र सरकार आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष तृणमुल काँग्रेसने केला होता. मात्र हा आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळून लावला. मात्र प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्यात येईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे याआधीही पेट्रोल पंपावरील पंतप्रधान मोदींचे फोटो असलेले होर्डींग हटवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने सरकारला दिले होते.
दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पदुच्चेरी या राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकांची मत मोजणी 2 मे ला करण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली
ओडिशातील धक्कादायक घटना; पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं
तुमच्या अर्णबला जेलमध्ये टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग का?- अनिल देशमुख
Comments are closed.