मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

Election Commission

Election Commission Notice | लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि एनडीएकडून देशभर प्रचार सुरू आहे. अबकी बार 400 पारचा नारा लावत नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक असलेल्या राज्यातील मतदारसंघात जात भाषणं करत आहेत. महाराष्ट्रात ते अनेकदा येऊन गेलेत. त्यांनी केलेल्या भाषणात आचारसंहितेचं उल्लघन केल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांना नोटीस बजावली आहे.

दोन्ही नेत्यांच्या भाषणाची निवडणूक आयोगाने (Election Commission Notice) दखल घेतली आहे. दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत बोलवलं. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष हे परस्परांविरोधात भाषा, धर्म, जातीवर भाष्य करताना दिसत आहेत. यामुळे आता निवडणूक आयोगाने (Election Commission Notice) दोघांनाही नोटीस बजावल्या आहेत.

राजकीय पक्षांनी आपले उमेदवार, स्टार प्रचारकांच्या वर्तणुकीची जबाबदारी घ्यावी असं निवडणूक आयोगाने (Election Commission Notice) म्हटलं आहे. उच्च पदावरील नेत्यांच्या भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होताना दिसतात. नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील बांसवडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना वक्तव्य केलं होतं. जन प्रतिनिधित्व अधिनियम, 1951 नुसार कलम 77 अंतर्गत ‘स्टार प्रचारकाचा’ दर्जा देणे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या अखत्यारितील विषय आहे, असं त्या नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलं.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

“काँग्रेस सरकार जर पुन्हा सत्तेवर आलं तर ते घुसखोरी करतील. ज्यांना जास्त मुलं आहेत ती त्यांच्यामध्ये वाटले जाऊ शकतात” मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने संताप व्यक्त केला. “पंतप्रधान हिंदू-मुस्लिम करतायत. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर कारवाई करावी,” असा आरोप काँग्रेसने केला.  (Election Commission Notice)

यादरम्यान आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी मोदींविषयी बोलण्यामागचं उत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारण्यात आलं. तर दुसरीकडे राहुल गांधी यांना मोदींनी काय वक्तव्य केलं याची उत्तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी द्यावं, असं निवडणूक आयोग म्हणत आहे.

राहुल गांधी यांच्यावर कोणता आरोप?

“राहुल गांधी त्यांच्या सभेमध्ये ज्या भाषेचा वापर करतात. त्याबाबत निवडणूक आयोगामध्ये तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी तमिळनाडू भाषेच्या आधारावर भ्रम निर्माण केला होता, असा आरोप भाजपने केला. राहुल गांधी आपल्या भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला.

News Title – Election Commission Notice To narendra Modi and Rahul Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

घराबाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राहुल गांधींच्या तोंडी पुन्हा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव, म्हणाले…

नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या माघारीनंतर भाजपकडून थेट ‘हा’ नेता मैदानात?

बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

‘त्या’ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत; संजय दत्तचेही नाव समोर आल्याने खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .