राजकारण्यांना सर्वात मोठा झटका?, निवडणूक आयोग हा निर्णय घेण्याच्या तयारीत
नवी दिल्ली | राजकारण्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाचे (Election Commission) आयुक्त राजीव कुमार (rajiv kumar) यांनी 6 प्रमुख मागण्यांचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. या प्रस्तावानुसार एक उमेदवार एकावेळी एकाच जागेसाठी उभ राहू शकतो. तसेच निवडणुकीपूर्वी चर्चत असणाऱ्या एक्झिट पोलला बंदी घालण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूका जवळ आल्या की कोणता उमेदवार कोणत्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करणार ही चर्चा सुरू होते. अनेक उमेदवार एकापेक्षा जास्त जागांसाठी उभे राहतात, पण आता निवडणूक आयोगाने केद्रांकडे केलेल्या मागणीनुसार एक उमेदवार एकावेळी एकाच जागेसाठी उभं राहू शकतो.
वोटिंग कार्ड आधाराशी लिंक करणं, नव्या मतदार नोंदणीसाठी सुनिश्चित तारखा, निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करता येणं, निवडणूक पूर्ण होईपर्यंत जनमतास बंदी या सर्व मागण्या राजीव कुमार यांनी केंद्राला दिलेल्या प्रस्तावात केल्या आहेत.
एक उमेदवार एकावेळी एकाच जागेसाठी उभ राहू शकतो या नियमांच्या बदलासाठी 1951 च्या 31(7) या कलमात बदल करावे लागणार आहेत. या प्रस्तावाचा निकाल लागेपर्यंत दोन जागांसाठी लढणाऱ्या राजकारण्यांसाठी कोंडी निर्माण झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून मोदींच्या देहूतील सभेआधी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला पोलिसांची नोटीस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती होणार?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाल्या…
‘…तर मला आणि भाजपला मैदानात उतरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
Comments are closed.