महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा झटका दिला आहे. आयोगाने कमलनाथ यांचं स्टार प्रचारकांच्या यादीतील नाव हटवलं आहे.

मध्यप्रदेशच्या सीईओने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. या अहवालात कमलनाथ यांनी आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन केल्याचं नमूद करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

कमलनाथ यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्यामुळे त्यांचं स्टार कँम्पेनरपद काढून घेण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात 28 जागांवर विधानसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. येत्या 3 नोव्हेंबर रोजी या जागांसाठी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

‘तुम्ही कठीण काळातही भन्नाट काम केलं’; मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून कौतुक

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण…- अशोक चव्हाण

विजय वडेट्टीवारांच्या त्या भूमिकेला भाजपचं समर्थन!

महिलेने मारहाण केल्यानंतरही संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या एकनाथ पार्टेंचा गृहमंत्र्यांकडून सत्कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या