बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसणार; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने राजकीय पक्षांना मात्र धक्का बसला आहे. राजकीय पक्षांना आता त्यांच्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जनतेसमोर उघड करावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नव्या नियमावलीनूसार गुन्हेगारी पार्श्वभूमी (Crime Record) असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर त्यामागची कारणं राजकीय पक्षांना स्पष्ट करावी लागणार आहेत. एखाद्या उमेदवाराविरोधात काही गुन्हे दाखल असतील तर त्याचा तपशील वर्तमानपत्र, संकेतस्थळ, टीव्ही यासारख्या माध्यमातून जाहीर करावा लागणार आहे.

राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देणं आता बंधनकारक होणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर राजकीय पक्षांची मात्र कोंडी होणार आहे. कारण उमेदवाराची खरी माहिती मतदारांना देणं ही जबाबदारी संबंधित राजकीय पक्षांची असणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे जनतेला चांगले उमेदवार मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे सरकार आहे”

चहामध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टींचा वापर करा आणि घरबसल्या झटपट वजन कमी करा

‘सत्तेतल्या दुर्योधनांना वाचवण्याचं पाप सुरु आहे’; चित्रा वाघ यांचा घणाघात

अशी करा Omicronवर मात; अदर पुनावाला यांनी शेअर केलं ‘ते’ सिक्रेट

‘आपण सर्वात वाईट टप्प्यातून जाऊ शकतो’; Omicronविषयी बिल गेट्सचा धक्कादायक इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More