बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

OBC Reservation! निवडणूक आयोगाचा ठाकरे सरकारला मोठा दणका

मुंबई | ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. अशातच ठाकरे सरकारच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानंतर आता राज्य निवडणूक आयोगानंही राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणामुळं रिक्त झालेल्या जागांसंदर्भात निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या जागा सोडून इतर सर्व जागांवर 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उर्वरित ओबीसींच्या जागांवर पुढील महिन्यात 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. परिणामी राज्य सरकारच्या निवडणूक रद्द करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. राज्य मंत्रिमंडळानं निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार ओबीसींच्या जागेवर आता सर्वसाधारण जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पुढील महिन्यात पार पडणार आहे. 21 डिसेंबर आणि 18 जानेवारी दोन्ही दिवशींच्या मतदानाची मतमोजणी ही एकाच दिवशी होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस मदान यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणाअभावी निवडणुका घेण्यात येवू नयेत, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी केली होती. पण निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत राज्य सरकारच्या मागणीला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

धक्कादायक! ‘या’ देशानं 11 दिवसांसाठी घातली हसण्यावर बंदी

‘बलात्काराचा आनंद घ्या’; म्हणणाऱ्या काॅंग्रेस नेत्यानं मागितली जाहीर माफी

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More