बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूरच्या निवडणुकीनं घात केला, कोरोनानं एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेतला!

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये कर्तव्य बजावताना शिक्षकाला कोरोना झाल्याने सहा सदस्यीय कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

सांगोला तालुक्यातील घेरडीमध्ये असलेल्या जगधनेवस्ती येथील माने कुटुंबावर काळाने घाला घातला. मतदान केंद्रावर कर्मचारी म्हणून प्रमोद माने या प्राथमिक शिक्षकाला नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर, संपूर्ण प्रक्रिया संपवून 17 एप्रिलला माने हे आपल्या घरी परतले. त्यानंतर, दोन दिवसांनी माने यांना त्रास जाणवू लागला. पण 12 तास काम केल्यामुळे हा त्रास होत असावा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण त्रास वाढल्याने 25 एप्रिलला सांगोला येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू झाले.

प्रमोद माने यांचे वडील वसंतराव माने आणि आई शशिकला माने यांच्यासह त्यांची मावशी जयश्री कोडग यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं यादरम्यान स्पष्ट झालं. या सर्वांवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रमोद यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांची तब्येत हळूहळू बिघडत चालली होती. प्रमोद माने यांचा एक भाऊ मुंबईत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे, त्यांनी तात्काळ 28 एप्रिलला प्रमोद यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल केलं. तसेच आई-वडिलांना दुसऱ्या दिवशी मुंबई येथे उपचारासाठी दाखल केलं.

जयश्री कोडग यांची तब्येत हळूहळू सुधारत होती पण त्यांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना ही 3 मे रोजी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान, प्रमोद माने यांचा 4 मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला त्या पाठोपाठच 5 मे रोजी त्यांच्या मावशी जयश्री कोडग आणि 6 व 7 मे रोजी एकापाठोपाठ एक वडील वसंतराव माने व आई शशिकला माने यांचं देखील दुःखद निधन झालं.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मतदान कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर प्रमोद माने हे येताना कोरोनाला घरी घेऊन आले आणि त्यानंतर हसत्या खेळत्या कुटुंबाला आपल्या कुटुंबातील 4 सदस्य गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. यादरम्यान प्रमोद यांच्या पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊन ते कोरोनामुक्त झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

थोडक्यात बातम्या

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर ही मोठी जबाबदारी, सरकारचा मोठा निर्णय

चिंताजनक! शनिवारी देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद; रूग्णसंख्याही वाढली

‘या’ राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊनही वाढवला

“राज्याला पुरेशी लस कशी मिळेल यासाठी केंद्राला पत्र जरूर लिहावं”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी उद्यापासून 3 दिवसांची सुट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More