शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं

Share Market | 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही तासांमध्ये देशाक कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. तसेच निवडणूक 2024 निकालाचे पडसाद दिवसभर देशातील शेअर बाजारावर (Share Market) दिसतील. निवडणूक निकालाच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारात मोठी उलथापालथ

सेन्सेक्स 1300 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. सकाळपासूनच बाजारात घट दिसून येत आहे. सेन्सेक्स सध्या 1300 अंकांच्या घसरणीसह 75,151.92 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, निफ्टी 400 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 22,808.40 च्या पातळीवर आहे.

सोमवारी शेअर बाजाराने (Share Market) जोरदार तेजीचे सत्र अनुभवले. आज पण शेअर बाजारात तेजीचे सत्र असण्याची शक्यता आहे. पण शेअर बाजार 2200 अंकांनी कोसळला आहे. सध्या सकाळी 09:11 वाजता बीएसईमध्ये घसरणीचे सत्र दिसत असले तरी निकालाचे चित्र स्पष्ट होताच निर्देशांक दुडूदुडू धावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Share Market | शेअर बाजार मोठी भरारी घेण्याचा अंदाज

सोमवारी बीएसई सेन्सेक आणि एनएसई निफ्टी दोन्ही निर्देशांकानी नवीन रेकॉर्ड तयार केला. सेन्सेक्सने 2,507.47 अंक (3.39 टक्के) आघाडीसह 76,468.78 अंकाचा टप्पा गाठला होता. आजही ही दोन्ही निर्देशांक मोठी भरारी घेण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार

शिरूरमध्ये अजितदादांना धक्का; अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टाकलं मागे

भाजपला धक्का बसण्याची शक्यता; प्रणिती शिंदे आघाडीवर

हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर

बारामतीत कांटे की टक्कर; पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर