बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं पहायला मिळालं होतं. अशातच आता ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे.

21 डिसेंबरला राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. या निवडणुका स्थगित करण्याची मागणी सर्वच पक्षांकडून करण्यात आली होती. अशातच जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. 27 टक्के ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गात करून निवडणुका घ्या तसेच निवडणूक आयोगाना निवडणुकीबाबत अध्यादेश काढावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, 27 टक्के जागांचे निकाल हे उरलेल्या 73 टक्के जागांच्या निकालावेळीच लावण्यात यावेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशानंतर आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“हा सगळा प्री प्लॅन होता, त्यांच्या जाण्यानं मनसेला…”

“…म्हणून माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली”; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं कारण

Bank worker Strike: …म्हणून उद्यापासून दोन दिवस बँका बंद

न्यायालयाचा आर्यन खानला मोठा दिलासा, ‘या’ अटींमध्ये दिली सूट

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका!

‘त्यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं पण…’ – रूपाली ठोंबरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More