बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणूका ‘या’ महिन्यात लागण्याची शक्यता!

मुंबई | सध्या विविध मुद्यांवरून शिवसेना आणि भाजप आमने सामने येताना दिसत आहे. त्याला कारण ठरतंय बहुचर्चित मुंबई महापालिकेच्या निवडणूका. मुंबई महापालिकेच्या निवडणूक लवकर लागणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. त्यानंतर राजकारणाला आरोप प्रत्यारोपाचं वळण लागलं होतं. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील 10 महापालिकांची निवडणूका फेब्रुवारीत लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महानगरपालिका, वीस नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रलंबित निवडणूका ऑक्टोबरमध्ये, तर आगामी निवडणूका फेब्रुवारीत नियोजित असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती बघून ऑक्टोबरमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिलं आहे. निवडणूका नियोजित करण्यात आली तर महापालिकांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रभागरचना अंतिम करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या लागू असलेल्या कायद्यानुसार राज्य सरकारने एकसदस्यीय प्रभाग निश्चित केलेला आहे. मात्र, हा प्रभाग दोन सदस्यांचा असावा, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

“शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली”

चिंताजनक! म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More