बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई | जवळपास गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. महामारीच्या संकटामुळे देशातील कित्येक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. अशातच देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता राज्यातील पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.सदन यांनी याबद्दल महिती दिली आहे.

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषदांतर्गत असणाऱ्या 33 पंचायत समित्यांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत. नागपूर, धुळे, वाशीम, नंदुरबार आणि अकोला या 5 जिल्हा परिषदा आणि या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, आता कोरोनामुळे त्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

19 जुलैला या पोटनिवडणुका पार पडणार होत्या. मात्र, कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्य शासनाने या निवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला याबाबत सविस्तर अहवाल मागितला होता.

राज्य शासनाने केलेल्या विनंतीचं गांभीर्य लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुका आज स्थगित केल्या आहेत. यासोबतच आचारसंहिता देखील शिथिल केली आहे. कोरोनाची स्थिती सुधरल्यानंतर पोटनिवडणूका घेण्यात येतील, असं देखील राज्य सरकारने यावेळी नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

“मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा मोदींचा अधिकार”

गरोदर महिलांसाठी कोरोना लस सुरक्षित – डॉ. वीके पॉल

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा! 15 जुलैपासून ‘या’ गावांमध्ये शाळांची घंटा पुन्हा वाजणार

पुण्यातील आजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More