बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंबधी राज्यनिवडणूक आयोगाने (State Election Commission) एक मोठा निर्णय घेतला आहे. 92 नगरपालिका आणि 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार होत्या. यासंबधी आता आयोगाने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीये.

राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 ग्रामपंचायतीच्यामधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी (OBC) आरक्षणाशिवाय होणार होत्या मात्र आता 19 जुलैल्या कोर्टात होणाऱ्या निवडणुकीनंतरच आता आयोगाचा निर्णय होईल अस सांगण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक निवडणुक आयोगाकडून काढण्यात आलं आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर(Kolhapur), नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका आणि 4 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील असं 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं जाहीर केलं होत. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.

या निवडणूका (Elections) ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याने अनेक पक्षातील नेत्यांनी याला विरोध केला होता. यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होत. यासंबधी आज कोर्टात सुनावणी झाली आहे. पुढची सुनावणी 19 जुलै ला होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी

मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर 

शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, बंडखोर आमदाराचं सूचक वक्तव्य

‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघात

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More