इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकार देणार सबसिडी?, मोठी माहिती आली समोर

Electric Vehicles Subsidy | केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाले आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.यानंतर लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. त्यापूर्वीच एक मोठी माहिती समोर आली आहे. सरकार इलेक्ट्रिक दुचाकींसाठी पुन्हा एकदा सबसिडी सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

इलेक्ट्रिक वाहनावरील सबसिडी सरकारने मार्च महिन्यात बंद केली होती. यापूर्वी सरकारने त्यात कपात केली होती. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा सबसिडी सुरू करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जातंय.

फेम-3 ची घोषणा होण्याची शक्यता

काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, सरकार 2024 च्या बजेटमध्ये फेम-3 योजनेची घोषणा करू शकते. मोदी सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं आहे. यानंतर फास्टर अ‍ॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासाठी तब्बल 10 हजार कोटींची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन खरेदीदारांची चांदी होणार आहे. सबसिडी (Electric Vehicles Subsidy) लागू झाल्यास वाहन खरेदी देखील वाढेल. दरम्यान, इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किमतीप्रति किलोवॅटवर सबसिडी दिली जाऊ शकते.

सरकार इलेक्ट्रिक वाहनावर देणार सबसिडी?

2024 मध्ये मार्च महिन्यात फेम-2 आणि राज्यांकडून मिळणारे अनुदान बंद करण्यात आले होते. यामुळे एप्रिल महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत मोठी घट झाली होती. अशात बऱ्याच कंपन्यांनी कमी रेंजचे अनेक मॉडेल्स लॉन्च केले. कमी किमतीचे मॉडेल्स आल्याने कंपन्यांच्या विक्रीत सुधारणा झाली असली तरी टॉप-स्पेक मॉडेल्सची मागणी कमी झाली आहे.

सरकारने मार्च महिन्यात सबसिडी (Electric Vehicles Subsidy) बंद केली पण त्यासोबतच इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीला चालना देण्यासाठी त्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (ईएमपीएस) जाहीर केली होती.यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ही योजना जुलै महिन्यापर्यंतच होती.

News Title : Electric Vehicles Subsidy

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कान..

“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”

“विठ्ठलाच्या नावाने दरोडा…”, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला टोला

अजितदादांचं भाजपला होतंय ओझं?, अजितदादांबाबत पुनर्विचार होणार…

शेअर बाजारने गाठला ऐतिहासिक उच्चांक! काय आहे रेकॉर्ड ओपनिंग लेव्हल