Electricity Scheme | लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारची आणखी एक योजना समोर आली आहे. ला़डकी बहीण योजनेत राज्यातील महिलांना महिना 1500 रूपये देण्यात येणार आहे. या योजनेमुळे विरोधकही धास्तावले आहेत. विरोधक उघडपणे विरोध करत नसल्याचं बोललं जातंय. त्यानंतर लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजना सरकारने समोर आणली आहे. या योजनेत बारावी, पदवी झालेल्या युवकांना कंपनीत सहा महिने काम करण्याची संधी मिळणार आहे. (Electricity Scheme)
त्याकाळात सरकारकडून महिन्याला पैसे दिले जाणार आहे. या दोन योजनेनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना आणली. त्यात शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे.
‘या’ शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज
राज्यातील वीज मोफत मिळणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयाचे परिवत्रक काढण्यात आलं नाही. ही योजना एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पासून लागू राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर केली. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Electricity Scheme)
मोफत वीज योजनेत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दोन वर्षे योजना राबवण्याबाबत निर्णय़ होईल. शासनाच्या या योजनेचा फायदा शेतकऱ्यांप्रमाणे महावितरणाला होणार आहे. महावितरणाच्या कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुलीची चिंता मिटणार आहे. महावितरणाला राज्य सरकार वीज बिलापोटीचे 14 हजार 760 कोटी रुपये देणार आहे.
वीज बिलाची थकबाकी महावितरणापुढे आव्हान
कृषी पंप वीज बिलाची थकबाकी वसुली हे महावितरणापुढे नेहमीच आव्हान राहिले आहे. राज्यात 2024 पर्यंत 47.41 लाख शेतकऱ्यांकडे कृषीपंप आहे. राज्यातील 30 टक्के वीज कृषी पंपासाठी लागते. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु या योजनांसाठी पैसे कुठून येणार? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. (Electricity Scheme)
News Title – Electricity Scheme For Farmers
महत्त्वाच्या बातम्या
राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना 8 दिवस सुट्ट्या जाहीर
“हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं जन्माला घाला”; प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त विधान
“घरातील एकटेपणा खायला उठतो, तो कमी करण्यासाठी मी..”; अभिनेत्री रेखा यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल