बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला आणखी मोठा धक्का! ‘या’ राज्यातील 11 आमदार अचानक दिल्लीला रवाना

नवी दिल्ली | पंजाबमध्ये राजकीय उलाथापालथ झाल्यानंतर पंजाबमध्ये काॅंग्रेस पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. पंजाबमधील काॅंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात बदल केल्यानंतरही त्या ठिकाणी वाद-विवाद सुरू आहेत. अशातच आता काॅंग्रेस पक्ष सत्तेत असलेल्या राज्यात काॅंग्रेसचे अकरा आमदार आज अचानक दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चेंना उधान आलं आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश वाघेल यांचे समर्थक असलेले आमदार वेगवेगळ्या विमानांमधून दिल्लीकडे रवाना झाले आहे. हे आमदार दिल्लीमध्ये हायकमांडचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे. मात्र काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यावर बोलणं टाळलं आहे. दिल्लीला रवाना झालेले आमदार अगोदर शिमला येथे जाणार आहेत. त्याठिकाणी ते एकत्र सुट्टी घालवतील, अशी बातमी समोर येत आहे.

दिल्लीकडे रवाना झालेल्या काॅंग्रेस आमदारांपैकी सर यू.डी. मिंज, राजकुमार यादव आणि विकास उपाध्याय यांची नावेच फक्त समोर येत आहेत. छत्तीसगडमध्ये  मुख्यमंत्र्यांच्या अडीच-अडीच फॉर्म्युल्यावरून उठलेलं वादळ आता शांत होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काॅंग्रेसमध्ये खलबतं सुरु आहेत. त्यानंतर पंजाबच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. अशातच आता छत्तीसगडमधील या राजकीय घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या- 

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

“हे तर ओल्या दुष्काळाचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा”

“…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलं भारतीय संघाचा मेन्टाॅर”

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More