Top News महाराष्ट्र मुंबई

उद्यापासून अकारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार!

Close-up Of Woman Having Video Chat On Digital Tablet In Classroom

मुंबई |  मराठा आरक्षणामुळे अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे

अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थी ज्या शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहे त्या शाखेसाठी त्याने नावनोंदणी करायची असून ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रक व आवश्यक तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे, असंही पाटील यांनी सांगितल.

दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या तासिका घेणार आहेत. विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता येणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”

“पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं”

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी- एकनाथ खडसे

“हिंमत असेल तर भाजपने हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या