बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; अकरावीची प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द

मुंबई | अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणारी प्रवेशपूर्व परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून आज रद्द करण्यात आली आहे. न्यायालय परीक्षा रद्द करताना म्हणालं की, अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थांच्या बाबतीत अन्याय झाला असता. त्यामुळे अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांवरच द्यावेत असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचा राज्य सरकारचा 28 मे चा जीआर न्यायमुर्ती रमेश धनुका आणि न्यायमुर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने रद्द केला आहे. अकरावीची प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द झाल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडलं आहे.

यंदा दहावीची परीक्षा कोरोना संक्रमनामुळे रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना नववीचे गुण आणि अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीेचे गुण देण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार होती.

दरम्यान, कोरोना संकटामुळे अनेक शिक्षण मंडळांना परीक्षा घेता आल्या नाहीत. मंडळाकडून अंतर्गत मुल्यमापन यांच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार होती मात्र आता उच्च न्यायालयाने प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द केल्याच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

धक्कादायक! आता कोरोनापेक्षाही धोकादायक ‘या’ विषाणूचा शिरकाव

सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, उमेदवारांचं गुन्हेगारी रेकाॅर्ड प्रसिध्द करण्याचा अवधी अवघा…

सुखद धक्का! नीरज चोप्राच्या सन्मानार्थ घेण्यात आला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More