पुणे | राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असं माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते.
हे सरकार मनुवादी विचारांनी ग्रासले आहे. सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं आहे, अशी टीका बी.जी. कोळसे पाटलांनी केली आहे. येत्या 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येणार असल्याचं कोळसे पाटलांनी सांगितलं.
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगलीचा काही संबध नाही. लोकांनी एल्गार परिषदेचा हेतू समजून घेतला पाहिजे. आम्हाला ऑनलाईन परिषद घ्यायला सांगता. तुम्ही मात्र सभा घेता, असंही बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले.
दरम्यान, 2017 डिसेंबरला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी संबंध जोडण्यात आला.
थोडक्यात बातम्या-
वाहनचालकांना मोठा दिलासा; फास्टटॅग लावण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदवाढ
2020 पेक्षा 2021 जास्त धोकादायक असेल?; WHOनं दिला ‘हा’ मोठा इशारा
कोरोनात तुमची नोकरी गेलीय का?; अशाप्रकारे सरकारकडून मिळवा ३ महिन्यांचा ५० टक्के पगार!
शेजारील विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं चक्क बोगदा खोदला; त्यानंतर…
रिया चक्रवतीच्या चाहत्यांसाठी नव्या वर्षात गुडन्यूज!