बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Elon Musk यांनी ट्विटरसोबतचा करार केला रद्द; धक्कादायक कारण समोर

नवी दिल्ली | बहुचर्चित असणाऱ्या ट्विटर (Twitter) अँप इलॉन मस्कने खरेदी केलं होतं. यानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा प्रंचड असा पाऊस पडत होता. एप्रिल महिन्यात इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केलं होतं. 44 अरब किमतीत ही डिल करण्यात आली होती. मस्क आणि ट्विटरची ही डील हाय व्होल्टेज ड्रामा पेक्षा कमी नव्हती.

या सगळ्या गोष्टीमध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवर बनावट खात्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्यांनी करार रद्द केला आहे. यासंबधी करार मोडल्याबद्दल इलॉन मस्क यांच्यावर कारवाई करणार असल्याचं ट्विटरच्या अध्याक्षांनी सांगितलं.

गेल्या तीन महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या कराराची चर्चा होत होती. त्यांच्या किमतीबाबत सीईओ(CEO) मध्ये मतभेद होते. 13 मे रोजी इलॉन मस्कने हा करार होल्डवर ठेवला होता. स्पॅम आणि बनावट खात्यासंबधी हा करार होल्डवर होता. यापासूनच इलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये मतभेद सुरू झाले.

मे महिन्याच्या अखेरीस त्यांचं भांडण ट्विटरवर आलं. मस्क आणि ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यात समोरासमोर बोलणी झाली. 16 जून रोजी मस्क यांनी तेथील स्टाफशी बातचीत केली. यानंतर ते ट्विटर खरेदी करतील अशी चर्चा होती पण आता त्यांच्या या निर्णयामुळे कोर्टात लढाई चालू होणार आहे.

थोडक्यात बातम्या  

“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”

राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता

आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम

शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“शिवसेना पुन्हा कधीच उभी रहाणार नाही, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More