बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलन मस्क यांच्या सर्वात वेगवान इंटरनेटसाठी बुकिंग सुरु, पाहा कसं करायचं रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली | भारतामध्ये जीओ आणि अन्य टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी टेस्ला या जगप्रसिद्ध कार कंपनीचे मालक एलन मस्क सज्ज झाले आहेत. मस्क यांची दुसरी कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात स्टारलिंकच्या इंटरनेट सेवेच्या बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

स्टारलिंकची इंटरनेट सेवा स्पेसेक्स ही एक एअरोस्पेस कंपनी कंट्रोल करते. स्पेसेक्स ही कंपनी सुद्धा मस्क यांची असून, त्यांनी या कंपनीची स्थापना 2002 मध्ये अंतराळात शोध व सेवा देण्यासाठी केली होती. आता स्पेसेक्सच्या मदतीने स्टारलिंक ही कंपनी सॅटेलाईट्स द्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे.

एलन मस्क यांच्या रिपोर्टनुसार भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा 2022 मध्ये सुरू होऊ शकते. मात्र, कनेक्शन घेण्यासाठी प्री-बुकिंग करणे आवश्यक आहे. भारतात प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. https://www.starlink.com या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बूकिंग करु शकतात. स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बुकिंग सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुर या शहरांमध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, प्री-बुकिंगसाठी 99 डॉलर म्हणजे 7 हजार 300 रुपये भरावे लागणार आहेत. हे पैसे रिफंडेबल आहेत. त्यामुळे तुम्ही बुकिंग रद्द केल्यास पुर्ण पैसे परत मिळण्याची सोय कंपनीने करून ठेवली आहे. या सेवेमध्ये टेस्टिंग पुर्ण होईपर्यंत  50-150Mbps चा स्पीड मिळेल आणि टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर 300 Mbps पर्यंत स्पीड मिळेल असं मस्क यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भारतातील सर्वात फास्ट इंटरनेट सेवा अनुभवण्यासाठी भारतातील नागरिक उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

एलन मस्क यांच्या मंगळ मोहिमेला मोठा धक्का; लाँचिंगवेळी घडला धक्कादायक प्रकार

राम मंदिरासाठी पैसे न दिल्यास धर्मातून बाहेर काढू; नाना पटोलेंना धमकी

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच, लायसन्सची गरज नाही… किंमत फक्त…

उपसरपंच निवडीवरून वाद, ग्रामपंचायत सदस्याची हत्या

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More