‘माझा संशयास्पद मृत्यू झाला तर…’; स्वत:च्याच मृत्यूबाबत Elon Musk यांचं खळबळजनक ट्विट
नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळख असलेले एलॉन मस्क (Elon Musk) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. एलॉन मल्क यांनी काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची (Twitter) खरेदी केली होती.
ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क आणखी एकदा चर्चेत आले आहेत. स्वत:च्याच मृत्यूबद्दल धक्कादायक ट्विट करत एलॉन मस्क यांनी सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली आहे.
‘जर माझा संशयास्पद मृत्यू झाला तर it’s been nice knowing ya’, असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं आहे. या ट्विटमुळे सर्वच बुचकळ्यात पडले असताना मस्क यांनी या ट्विटमध्ये ‘nice knowing ya’ या गाण्याचा देखील उल्लेख केला आहे. या कारणामुळे नेटकऱ्यांचा संभ्रम अधिकच वाढला आहे.
दरम्यान, एलॉन मस्क यांच्या या ट्विटचा प्रत्येक जण आपआपल्या परिने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे. मस्क यांनी केलेल्या या ट्विटचा थेट अंदाज लावता येत नसला तरी हे ट्विट अवघ्या काही वेळातच व्हायरल झालं असून जगभरातील लोक यावर आपली प्रतिक्रिया देत आहे.
If I die under mysterious circumstances, it’s been nice knowin ya
— Elon Musk (@elonmusk) May 9, 2022
थोडक्यात बातम्या-
एकनाथ खडसेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…
पुतिन यांना जोर का झटका! अमेरिकेसह जी-7 देशांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मोठी बातमी! नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?
कच्च्या तेलाच्या दरात वाढ, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
IPS कृष्णप्रकाश यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे
Comments are closed.