बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

कोलंबो | श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabay Rajapakshe) यांच्या पलायनानंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wikramsinghe) यांनी सूत्रे सांभाळत देशात आणीबाणीची (Emergency) घोषणा केली आहे. तसेच श्रीलंकेत संचारबंदी (Curfew) देखील लागू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी गोटाबाया यांनी लष्करी विमानाने देशातून मालदिवसाठी पलायन केले. त्यानंतर मोठा जनसागर राजधानी कोलंबोत उतरला. याच पार्श्वभूमीवर ही आणिबाणी लागू करण्यात आली आहे.

मालदिवच्या मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने राष्ट्रपती गोटाबायांनी त्यांच्या पत्नी आणि दोन सुरक्षारक्षकांसोबत मालदिवला पलायान केले. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याचे कळते आहे, परंतु त्यांच्या राजीनाम्याचे पत्र संसदेच्या अध्यक्षांना अद्याप प्राप्त झाले नाही. राजीनाम्यानंतर त्यांना अटक होऊ नये, म्हणून त्यांनी देशातून पळ काढल्याचे वृत्त आहे.

श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार, गोटाबाया यांनी राजीनामा दिल्यावर, संसद आपल्या सभासदांमधून दुसरा राष्ट्रपती निवडत नाही तोपर्यंत, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे देशाचे अंतरीम राष्ट्रपती (Interim President) म्हणून कार्यभार सांभाळतील. परंतु रानिल विक्रमसिंघे यांनी 9 जुलै रोजी ट्विट करत आपण पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले. त्यांनी विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय सरकार (All Party Government) स्थापनेच्या मागणीला पाठींबा दिला होता.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती आणि महागाईला (Inflation) कंटाळून श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरली होती. त्यांनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान आणि राष्ट्रपतींचे सचिवालय या ठिकाणी कब्जा करत तोडफोड केली आणि लंकेत अराजकता पसरली. याच पार्श्वभूमीवर आता श्रीलंकेत आणीबाणी आणि संचारबंदी लागू झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

लिंबू पाणी जितकं प्रभावी तितकंच घातकही, उद्भवू शकतात ‘हे’ सहा आजार

‘राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि मला म्हणाले अस्सलाम वालेकुम’ -उद्धव ठाकरे

श्रीलंकेत जनक्षोभ, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळाले

‘ही भूमिका अनाकलनीय’, शिवसेनेनं मुर्मूंना पाठींबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More